कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसताना जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेच्या विरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई ( २२ सप्टेंबर ) : बारावी आणि दहावी च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसताना ही पुढील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून महाविद्यालयांनी परीक्षा जाहिर केल्या आहेत. याविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप केदारे यांनी सांगितले.

12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष कला ( F. Y. B.A), वाणिज्य ( F. Y. Bcom) आणि विज्ञान ( F. Y. B.Sc.) शाखेत प्रवेश मिळालेला नाही. यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रम BMS, BMM, BAF, BFM मध्ये ही प्रवेश मिळालेला नाही. तसेच कित्येक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. असे असताना सप्ताहाभरा नंतर महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. ते महाविद्यालयात नव्या इयत्तेच्या वर्गात जाऊन बसलेले नाहीत. त्यांनी नव्या इयत्तेचे पुस्तक ही हातात घेतलेले नाही. त्यांना कोणी शिकवलेले नाही. त्यांचा अभ्यास ही झालेला नाही. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालक वणवण भटकत आहे. असे असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून परीक्षा जाहिर करणे म्हणजे केवळ विद्यार्थ्यांसोबत पोरखेळ पणा सुरु असल्याचे केदारे यांनी सांगितले. प्रथम विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, त्यांना शिकवा आणि मग त्यांच्या परीक्षा घेणे योग्य आहे. अन्यथा याविरोधात मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार त्यांनी सांगितले.

आठवडाभरा पूर्वी कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मंत्री तावडे यांनी प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना निर्देश ही दिले होते. मात्र जो पर्यंत परिपत्रक येत नाही, तोवर प्रवेशाच्या जागा वाढविण्यात येणार नसल्याचा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. यामध्ये विद्यार्थांचे नुकसान होत आहे, अशी माहिती रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप केदारे यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget