मोबाईल अॅपद्वारे हरित सेनेची नोंदणी झाली सोपी; लवकरच गुगल प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध होणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई ( २३ सप्टेंबर ) : वन, वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यास चालना देण्यासाठी हरित सेनेचे मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून वन विभागाच्या www.mahaforest.nic.in आणि ग्रीन आर्मी महाराष्ट्राच्या
(www.greenarmy.mahaforest.gov.in) संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. लवकरच गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध होईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मोबाईल ॲपमुळे हरित सेनेत नाव नोंदवणे आता अधिक सोपे झाल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, सध्या 31 लाखाहून अधिक सदस्यांनी हरित सेनेमध्ये आपले नाव नोंदवले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हरित सेनेचे हे ॲप उपलब्ध झाल्यानंतर हरित सेनेच्या सदस्यांची नोंदणी झपाट्याने वाढून ती एक कोटी इतकी होण्यास मदत होईल.

ग्रीन आर्मी मोबाईल अॅप्लिकेशनमुळे दोन टप्प्यांमध्ये स्वयंसेवकांना नोंदणी सहज शक्य होईल. टप्पा -1 प्राथमिक माहिती (म्हणजेच नाव, DOB, संपर्क क्र. इत्यादी) असेल आणि टप्पा - 2 आवडीचे क्षेत्र, स्थान आणि OTP द्वारे सत्यापन होईल. हे मोबाईल अॅप्लिकेशन नागरिकांना महाराष्ट्र वन विभागाच्या विविध हरित उपक्रमांची माहिती देणे, त्यात सहभागी होणे, हरित सेनेत आपले नाव नोंदवणे, वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मदत करणे, वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेणे, ट्रेकिंग यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच विभागाच्या विविध योजनांमध्ये भाग घेण्यास सक्षम करेल.

वन विभागाने राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. नुकतीच 1 जुलै ते 7 जुलै 2017 काळात 5 कोटी 43 लाखाहून अधिक वृक्ष लागवड राज्यात झाली आहे. 2018 च्या जुलै महिन्यात राज्यात 13 कोटी तर 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने लोकांना वृक्ष लागवड कार्यक्रमाची माहिती देणे, वृक्ष लागवड कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे यासाठी हरित सेनेचे हे मोबाईल ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास वनमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget