डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश

मुंबई ( २६ सप्टेंबर ) : येथील डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयात गरीब रुग्णांवरील उपचाराची योजना राबविण्यसंदर्भात आढळेल्या त्रुटींबद्दल रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

धर्मादाय आयुक्त शि. ग. डिगे यांनी डॉ. नानावटी रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे गरीब रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भातील योजनेची माहिती व उपचार यामध्ये त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी चौकशी करून व रुग्णालयाची बाजू ऐकून डिगे यांनी रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66 ख नुसार गुन्हा दाखल करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना परवानगी दिली आहे.

धर्मादाय आयुक्त डिगे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, डॉ. नानावटी रुग्णालयामध्ये एक सामान्य रुग्ण म्हणून भेट दिली. त्यावेळेस उच्च न्यायालयाच्या योजनेअंतर्गत असलेल्या अनुषंगाने त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये या योजनेसंदर्भातील फलक दर्शनी भागात लावण्यात आले नव्हते. तसेच या योजनेनुसार निर्धन रुग्णांसाठी 33 व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी 33 अशा खाटा राखीव असणे अपेक्षित होते. या भेटीदरम्यान या खाटांवर इतर रुग्ण आढळून आले व केवळ 12 रुग्ण आरक्षित खाटांवर या योजनेअंतर्गत उपचार घेत असल्याचे दिसून आले. तसेच प्रवेश कक्षातील कर्मचाऱ्यास व समाजसेवकास योजनेची माहिती नसणे अशा त्रुटी आढळून आल्या. यासंदर्भात रुग्णालयाने बाजू मांडली. मात्र, या रुग्णालयामध्ये योग्य पद्धतीने गरिबांवर उपचार होत नाहीत, असे निरीक्षण आयुक्तांनी या आदेशात मांडले आहे. तसेच आढळलेल्या त्रुटी या मे 2017 मध्ये करण्यात आलेल्या तपासणीमधील त्रुटी सारख्याच असून, त्यामध्ये कुठलाही बदल आढळून आला नाही, असेही यामध्ये म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget