परळ-एल्फिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

मुंबई (२९ सप्टेंबर) : परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केईएम हॉस्पीटल येथे भेट घेऊन विचारपूस केली. परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेचच विमानतळावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून 39 जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. इतर सर्वजण धोक्याच्या बाहेर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. जखमींना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे मंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल. यापुढे अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. मुंबईतील अशा सर्व रेल्वे पुलांचे रेल्वे मंत्रालयाने ऑडिट हाती घेतले आहे. यासंदर्भात आपले केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणे झाले असून रेल्वे मंत्रालयाला इतर काही मदत हवी असल्यास राज्य शासनातर्फे ती करण्यात येईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget