बॅंक ऑफ महाराष्‍ट्रने उत्‍साहात साजरा केला 83वा स्‍थापना दिन

नवी मुंबई ( २२ सप्टेंबर ) : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र, रायगड क्षेत्राने नुकताच आपला 83 वा स्‍थापना दिन मोठया थाटात वाशी येथे होटल तुंगा मध्ये आपल्‍या सन्‍माननीय ग्राहकांसोबत साजरा केला. यावेळी कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्‍त भरत शेळके, ठाणे गुन्‍हे शाखा, बॅंकेच्‍या क्षेत्रीय प्रबंधक, सुनिता भोसले व उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे उपस्थित होते.

स्‍थापना दिनाची सुरुवात ग्राहकांच्‍या मोफत स्‍वास्‍थ तपासणीने बॅंकेच्‍या वाशी स्थिती रायगड क्षेत्रीय कार्यालयामध्‍ये बॅंक, सिग्‍ना टी.के.के. व फोर्टीज रुग्‍ण्‍यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने करण्‍यात आली.

प्रमख अतिथी सहाय्यक पोलीस आयुक्‍त, भरत शेळके म्‍हणाले की, बॅंक ऑफ महाराष्‍ट्र ही सर्व स्‍तरावर चांगले कार्य करीत आहे म्‍हणूनच तिचा 82 वर्षाचा दैदिप्‍यमान असा बॅंकींगचा ग्राहक सेवेचा वारसा आहे. यावेळी भरत शेळके म्‍हणाले की, गुन्‍हेगारीचे स्‍वरुप बदलत आहे आता दरोडे बंद होऊन इंटरनेटच्‍या सहाय्याने बॅंकेच्‍या ग्राहकावर चोरटे डाका टाकत आहे. यासाठी सर्वांनी सजग असण्‍याची गरज आहे असे ते म्‍हणाले. बॅंक आपल्‍या ग्राहकांना वेळोवेळी देत असलेल्‍या सुचनांकडे जर ग्राहकांनी लक्ष्‍य दिले तर आपली फसवणुक होणार नाही असे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

या प्रसंगी रायगड क्षेत्राच्‍या क्षेत्रीय प्रबंधक, सुनिता भोसले म्‍हणाल्‍या की, बॅंक ऑफ महाराष्‍ट्र 83 वा स्‍थापना दिन साजरा करीत आहे ते केवळ ग्राहकांच्‍या सहकार्यामुळेच. या प्रसंगी सुनिता भोसले यांनी ग्राहकांना बॅंकेच्‍या विविध ऋण योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले व भविष्‍यात सुध्‍दा ग्राहकांकडून असेच सहकार्य मिळेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

सिग्‍ना टी.के.के. स्‍वास्‍थ विमा चे प्रतिनिधी, रंजनकुमार गौडा, फयुचर जनरली चे प्रतिनिधी चिन्‍मय दिक्षीत व बॅंकेच्‍या अधिकारी आशा पेडणेकर यांनी पी.पी.टी. द्वारे ग्राहकांना योजनांबद्दल माहिती दिली. या प्रसंगी बॅंकेचे आयोजना अधिकारी जितेंद्र मेंघानी यांनी आपल्‍या सुमधूर आवाजाने गाणे सादर करुन सर्वांचे लक्ष्‍य वेधुन आनंदी वातावरणाची निर्मीती केली.

बॅंकेचे ग्राहक मे. शरयू मोटर्सचे प्रो. विजय सॉलियन, राजेंद्र हांडे, सुनिल हेमगुडे यांनी बॅंकेच्‍या चांगल्‍या सेवेबद्दल आपले मनोगत व्‍यक्‍त करुन स्‍थापना दिनाच्‍या शुभेच्छा दिल्‍या. या प्रसंगीप्रमुख अतिथींचा परिचय उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे यांनी दिला तर‍ कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अरविंद मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीते करीता जितेंद्र मेंघानी, अरविंद मोरे, व्‍ही. रंजन, आशा काबूरगडे, वत्‍सला भंगीरा, अखिला पसरेचा जोसेफ, योगेश मोरे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास बॅंकेच्‍या विविध शाखांचे शाखा प्रबंधक, अधिकारी, कर्मचारी वर्ग व ग्राहक मोठया संख्‍येने उपस्थित होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget