डिझाइनमध्ये करिअर

- देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) औरंगाबाद

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ डिझाइन ही स्वायत्त संस्था आहे. संसदेने 2014 साली या संस्थेस राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने देखील संस्थेस वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

जागतिक दर्जाचे शिक्षण आणि डिझाइन विषयक जागृती निर्माण करुन जीवनाचा दर्जा उंचाविणे, देशाच्या विविध क्षेत्रातील डिझाइन विषयक गरजा ओळखून व्यावसायिक निर्माण करणे, डिझाइन तंत्रज्ञ निर्माण करणे, विविध संशोधन प्रकल्प हाती घेणे हे संस्थेचे ध्येय आहे.

संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. वर्ष 2018-19 च्या शैक्षणिक सत्रासाठी संस्थेने नुकतीच जाहिरात प्रसिध्द केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये 4 वर्षाचा "बॅचलर ऑफ डिझाइन" हा अभ्यासक्रम अहमदाबाद येथील संकुलात, मास्टर ऑफ डिझाइन हा अडीच वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम अहमदाबाद, बंगलूरु आणि गांधीनगर येथील संकुलात तर ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन डिझाइन हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम विजयवाडा येथील संकुलात शिकविण्यात येतो.

या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत करावयाचे असून प्रवेश परीक्षा रविवार 7 जानेवारी 2018 रोजी होईल. प्रवेशासाठी पात्रता, जागांची संख्या, प्रवेश परीक्षेचे केंद्र, आरक्षणाचे नियम आणि अन्य माहिती संस्थेच्या http://admissions.nid.edu या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget