बी.एस.सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी : नवी संधी

- देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती) औरंगाबाद


बी.एस.सी . पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना एक नवी संधी आहे. या अभ्यास क्रमाकरिता उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म दिनांक 31 डिसेंबर 2000 पूर्वी झालेला असावा. उमेदवाराने दहावी आणि बारावी शासन मान्य संस्थांमधून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झालेला असावा.

या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. जाहिरात वर्तमानपत्रात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिनांक 27.9.2017 रोजी प्रसिध्द झाली असून विद्यार्थ्यांनी व्यक्तीश: (विद्यार्थी/पालक) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचा दिनांक 28.9.2017 ते दिनांक 6.10.2017 (सुट्टीचे दिवस वगळून) पर्यन्त आहे. अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर दिनांक 7.10.2017 रोजी (दुपारी 4.00वाजता) प्रकाशित करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे व आवश्यक शुल्काच्या धनाकर्षासह या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा कालावधी दिनांक 9.10.2017 ते 12.10.2017 (सांयकाळी 5.00 वाजेपर्यत) राहील. या मुदतीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दिनांक 7.10.2017 रोजीच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे व आवश्यक शुल्काच्या धनाकर्षासह प्रवेशाची मुदत दिनांक 16.10.2017 पर्यन्त असेल. या अभ्यासक्रमा करिता प्रवेशाचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2017 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यत) राहील.

विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेकरिता अर्जासोबत भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता 12वी (विज्ञान शखा) ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह‍ उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला, स्थानांतर प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (दिनांक 31.3.2018 पर्यंत व्हॅलिड असलेले). छायांकित प्रती जोडाव्यात.

या अभ्यासक्रमाकरिता अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज विद्यार्थ्यांनी/पालकांनी व्यक्तीश: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सादर करावा. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरिता उपलब्ध जागांचा विषयनिहाय तसेच संवर्गनिहाय तक्ता, तसेच अर्ज व मेडिकल फिटनेस प्रमाणपत्राचा नमुना या महाविद्यालयाच्या www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर तसेच महाविद्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद दूरध्वनी क्रमांक 0240-2402412-19, 2402028, फॅक्स क्र.2040-2402418-19 यावर संपर्क साधावा. ई-मेल- deangmca@gmail.com
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget