10 के इंटेंसिटी पुणे रन ला जबरदस्त प्रतिसाद

- करण सिंग, प्रियांका चाउरकर 10 के मेराथान चे विजेते
- विजेत्यांसाठी एकूण 50 लाखांचा पुरस्कार निधि

पुणे (१० सप्टेंबर ) : करण सिंग आणि प्रियांका चाउरकर यानी 10 के इंटेंसिटी रन पुरूष आणि महिला या गटात अनुक्रमे 32.5 आणि 41.46 मिनिटात पूर्ण करून जिंकली. ही दौड बघण्यासाठी रविवारी पुण्याच्या बेलावाडी काॅम्लेक्स मध्ये खच्चून गर्दी होती.

पुणे रन मध्ये विविध क्षे‍त्रातील स्वत. ची वेगळी चमक आणि ग्लैमर असणाऱ्या क्रिडापटूंची यात दिमाखदार भागीदारी होती. या बरोबरच पुण्याच्या स्थानिक लोकांचा पण या कार्यक्रमात सहभाग होता.

पुणे रन नीं यूरोप, साउथ कोरिया आणि आफ्रिका महाद्वीपातल्या अनेक आंतरराष्ट्रीय धावकांना आकर्षिले आहे. या शिवाय पुणे पोलीसने सुद्धा आपल्या प्रतिनिधीना या दौडमध्ये भाग घेण्यास खास करून पाठविले. ह्या प्रतिनिधीनीं ‘अ ग्रीन एंड हेल्दी पुणे सिटी’ या भावनेला प्रोत्साहन दिले.

पुणे दौड मध्ये अनेक प्रख्यात व्यक्तिंनी भाग घेतला. भूतपूर्व अोलंपिक नेमबाज आणि राष्ट्र मंडळ खेळात स्वर्ण पदक पटकवणारी अंजली भागवत, भूतपूर्व कुश्तीगीर काका पवार, महाराष्ट्र ऑल्मपिक एसोसिएशनचे उपाध्यक्ष प्रह्लाद सावंत आणि त्याच बरोबर आमदार भीमराव तपकीर यांनी या हिरवा झेंडा दाखवला. या दौड मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय धाविका लीलम्मा अलफोंसो या सुद्धा वरिष्ठ गटात सामील झाल्या. 

या समारंभाबद्दल बोलताना अंजली भागवत म्हणाल्या की, त्यांचं या कार्यक्रमाला पूर्णपणे समर्थन आहे. कारण या कार्यक्रमातून होणारे उत्पन्न भारतातील खेळाडू आणि ऑलम्पियन्सला जाणार अाहे. त्यामुळे भारतातील विभिन्न भागांत खेळ एक्टीविटीजना प्रोत्साहन मिळेल.

त्या म्हणाल्या ‘ही एक मोठी संकल्पना आहे. ह्याचा प्रचार भारताच्या विभिन्न भागांत होतो आहे. मी पुण्याच्या लोकांना खरचं दाद देते की, ज्यांनी सकाळी एकत्र येवून ‘हरित आणि स्वस्थ भारत’ या संकल्पनेला प्रतिसाद दिला. याच उत्साहानी ही मोहीम येणाऱ्या काही हप्त्यात मोठे स्वरूप घेईल, याची मला खात्री आहे. या आयोजनाला ‘एथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडिया’ तर्फे पण भरपूर प्रतिसाद मिळाला. पुण्याहून सुरू झालेल्या ह्या 10 के इंटेंसिटी दौड चे पुढचे पाऊल इंदौर शहरात पडणार आहे. ही दौड 1 आॅक्टोबर2017 रोजी होणार असून विजेत्यांसाठी अनुक्रमे 35 हजार, 25 हजार आणि 15 हजार रूपयांचापुरस्कार निधि ठेवण्यात आला आहे.

या रन बद्दल बोलताना भूतपूर्व अोलंपियन आणि ‘एंडी इंवेंट मैनेजमेंट’ चे संस्थापक आणि संचालक श्रीयुत आनंद मेंजीज म्हणाले की, ‘ ही सफल दौड होती. मी एंडी इंवेट मैनेजमेंट च्यावतीने सगळ्या खेळाडुंचा आभारी आहे. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो, ज्यांनी देशाला हरित आणि निरोगी ठेवण्याचा संकल्प केला आहे. ह्याच भावनेने आम्ही इंदौरमध्ये ही दौड 1 आॅक्टोबर 2017 रोजी आयोजित करु.

10 के इंटेंसिटी दौड़ इंडियन ओलंपियन एसोसिएशन (भूतपूर्व अोलंपिक खेळाडुंची संस्था) ह्यांचा सहयोगाने आयोजित करण्यात आले. ते ह्याचे चैरिटी पार्टनर असून ह्या दौड मधून होणारे उत्पन्न त्यानांच देण्यात येईल. ही रक्कम भूतपूर्व आणि वर्तमान ओलंपिक खेळाडुंसह नवोदित खेळाडु मध्ये विभागत येईल. या रक्क्मेने एक भक्कम पायभूत यत्रंणा उभी करण्यास मदत मिळेल. ह्यामुळे न केवळ वर्तमान खेळाडुंना प्रेरणा मिळेल परंतु देशात भावी अोलंपियन्स पण तयार होतील.

पुण्याहून सुरू झालेली ही 10 के इंटेंसिटी रन आता इंदौर, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरू, मुंबई,बरोडा, दिल्ली होत याची सांगता 11 फेब्रुअरी 2017 रोजी गोव्यात होइल. या सर्व शहरांमध्ये होणाऱ्या 10के इंटेसिटी दौड च्या विजेत्यांसाठी 50 लाखांची ची रक्कम ठेवण्यात आली आहे.

निकाल: 

10 के पुरुष विजेते: करण सिंग 32.5 मिनिटे, प्रह्लाद सिंग 32.6 मिनिटे, स्वप्निल सावंत 32.7मिनिटे

महिला विजेती: प्रियांका चाउरकर 41.56 मिनिटे, संपदा बुचडे 42.44 मिनिटे, विनया मालुसरे 43.19मिनिटे
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget