हिरकमहोत्सवी स्थापनादिनी रिपाइंचे शिर्डीत प्रचंड शक्तिप्रदर्शन

रिपाइंकडे असलेल्या गर्दीचे रूपांतर मतदानाच्या शक्तीत करा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

शिर्डी ( ४ ऑक्टोबर ) - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा 60 वा स्थापना दिन आज शिर्डी येथे साजरा झाला . त्यानिमित्त रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइंचे प्रचंड शक्तिप्रदर्शन झाले. या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अहमदनगरचे पालक मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे, आमदार स्नेहलता कोल्हे, सौ सीमाताई आठवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले यांचे सुपुत्र कु . जीत आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइंची बाल आघाडी स्थापन झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर या दोघा मान्यवरांनी कु. जीत चा सत्कार करण्यात केला.

शिर्डी मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादीने ने दगाबाजी केल्याने आपला पराभव झाला म्हणून आपण शरद पवार आणि काँग्रेस ला सोडले. त्यानंतरच भाजप शिवसेनेशी नाते जोडले. आज महामेळाव्यास प्रचंड गर्दी जमली आहे. मी जाईल तेथे लोकांची गर्दी असते. मात्र या गर्दी चे मतदानाच्या रूपातील शक्तीत परिवर्तन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी आजपासून करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शिर्डीतील माझ्या पराभवाला केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरून चालणार नाही तर त्या पराभवाची जबाबदारी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली पाहिजे. त्यामुळे केवळ हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणुका लढण्याची तयारी रिपाइं कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. शिस्त पाळा . केंद्रसरकारच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हा . उद्योग उभारा असे आवाहन रामदास आठवलेंनी केले .

या महामेळाव्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न 'किताब देण्याचा ठरावासोबत अनेक महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले असल्याची माहिती रामदास आठवलेंनी दिली .

रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे . येथे प्रचंड संख्येने आलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांपैकी किती जण पंचायत समिती ;जिल्हा परिषद ;महापालिके मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत असा सवाल पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जमलेल्या रिपाइं च्या गर्दीला विचारला. रिपाइं कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केवळ गर्दी असून चालणार नाही तर या गर्दीची मतदानाच्या रूपाने ताकद दिसली पाहिजे. माझ्या रासप पक्षाचे राज्यात 90 नगरसेवक आणि 6 जिल्हा परिषदेत अध्यक्ष आहेत. केवळ 14 वर्षात माझे लोक निवडून येऊ लागलेत तसे रिपाइं चे ही लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत याबद्दल निर्धार करा, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले .सरकार कुणाचेही असले तरी ना. रामदास आठवले मंत्री असतात असेही जानकर म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या हिरकामहोत्सवास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारा त्रास राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता होणार नाही. कुटुंबातील एका व्यक्तीकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल ते कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील सर्वांना लागू असेल असा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घरतल्याची खुशखबर ना .चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.

रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते आहेत . निवडणुकीत प्रत्येक पक्षाला निळा झेंडा पाहिजे असतो . मात्र रामदास आठवलेंकडेच रिपाइं ची खरी ताकद आहे. रिपब्लिकन पक्षाशी युती केवळ निवडणुकासाठी नाही असे मत व्यक्त करीत पालक मंत्री राम शिंदे यांनी रिपाइंच्या हिरकमहोत्सवी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार विनायक मेटे यांनी रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी आपले लोक प्रतिनिधी निवडून आणण्याचा निर्धार करा अन्यथा काँग्रेसप्रमाणे भाजप ही रिपाइंची उपेक्षा करतील. आता केवळ तोंडी सहानुभूती सत्ताधाऱ्यांची आहे. मतदानात ताकद दाखवा. आठवलेसाहेब मोठे नेते आहेत त्यांना अधिक मोठे करण्यासाठी रिपाइंचे लोकप्रतिनिधी निवडून आणा तरच सत्तेत खरा न्याय मिळेल असे मेटे म्हणले.

यावेळी अविनाश महातेकर, मोहनलाल पाटील, भुपेश थुलक,र राजा सरवदे, बाबुराव कदम, काकासाहेब खंबाळकर, प्रीतिष जळगावकर, विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, गौतम सोनवणे, चंद्रशेखर कांबळे, पप्पू कागदे, श्रीकांत भालेराव, फारुखभाई दळवी, प्रल्हाद जाधव, हेमंत रणपिसे, संगीता आठवले, आशाताई लांडगे, चांद्रकांता सोनकांबळे, अभयाताई सोनवणे, निताताई अडसुळे, विजय शिंगाडे, सुनील साळवे, बाबासाहेब गायकवाड, अरुण पाठारे, ममता आढांगळे, महेंद्र कांबळे, संतोष पवार, भीमराव सावतकर, अशोक गायकवाड, असित गांगुर्डे, रमेश मकासरे अनेक मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget