लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालय इमारतीची संरचनात्‍मक दुरुस्‍तीबाबत नागरिकांना आवाहन

मुंबई ( १७ ऑक्टोबर ) : लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालय (सायन हॉस्पिटल) गेल्‍या ६० वर्षांपासून मुंबईतील व मुंबई बाहेरील नागरिकांना वैद्यकीय सेवा अविरतपणे देत आहे. लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालयाच्‍या दुरुस्‍तीचे काम मोठ्या प्रमाणावर व टप्‍प्‍याटप्‍प्‍याने दिनांक १ ऑक्‍टोबर, २०१७ पासून सुरु करण्‍यात आलेले आहे.

या कामात विविध कक्ष (वॉर्ड) तसेच ऑपरेशन थिएटरची दुरुस्‍ती करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे दरम्‍यानच्‍या काळात या रुग्‍णालयातील इतर कक्षात तसेच नागरी आरोग्‍य केंद्र, धारावी (छोटा सायन हॉस्पिटल) आणि रावळी कॅम्‍प प्रसूतिगृह (मॅटर्निटी होम) मध्‍ये रुग्‍णांची पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. तथापि, उपलब्‍ध जागेची कमतरता लक्षात घेता, अंतर्गत रुग्‍णशय्या, ऑपरेशन थिएटर्स आणि आय.सी.यु. (ICU) अशा सर्व विभागात रुग्‍णांसाठी जागा कमी पडण्‍याची शक्‍यता आहे.

लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालय इमारतीची संरचनात्‍मक दुरुस्‍तीची कामे हाती घेतल्‍याने इतर रुग्‍णालये, आरोग्‍य केंद्रे यांनी या रुग्‍णालयाकडे संदर्भित (Referral) केलेल्‍या रुग्‍णांना, मुंबई महानगरपालिकेच्‍या अन्‍य रुग्‍णालयांत किंवा इतर सरकारी रुग्‍णालयांत निर्देशित करण्‍याचे आवाहन महापालिकेच्‍या संबंधित रुग्‍णालयाने केले आहे. रुग्‍णांच्‍या व नातेवाईकांच्‍या होणाऱया गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्‍यक्‍त केली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget