पर्यटन विकास महामंडळातर्फे राजभवनला बॅटरीवरील वाहन

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राजभवन पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन पर्यटन मंत्री, जयकुमार रावल यांनी आज राजभवन येथे दिले.

सामान्य लोकांना राजभवन पाहता यावे यासाठी वारसा स्थळाची कवाडे सामान्यांसाठी खुली केली जातात. ही दोन तासांची भ्रमंती करण्यासाठी बॅटरीवर चालणारे हे वाहन उपयुक्त ठरणार आहे.

राजभवन येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे. वृध्द व दिव्यांग व्यक्तींसाठी याचा वापर करण्यात येणार आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी 21 जून 2015 रोजी राजभवन सर्वांसाठी खुले करण्याची घोषणा केली होती व प्रत्यक्षामध्ये 1 सप्टेंबर 2015 पासून ऑन लाईन बुकींग करुन राजभवन सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. राज्यपालांनी प्रत्येक महिन्याचा चौथा शनिवार हा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget