आरेतील जनतेची त्रासापासून लवकरच सुटका

- जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत तीन पर्यायाच्या माध्यमातून मार्ग काढला

मुंबई ( १२ ऑक्टोबर ) : आरेच्या मुख्य रस्त्यावरील पुल खचल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आल्याने येथील जनतेला भेडसावणार्‍या समस्यांतून जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तीन पर्यायाच्या माध्यमातून मार्ग काढला आहे. या पर्यायांमुळे जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवर होणारी वाहतुकीची कोंडीही काही प्रमाणात कमी होण्यास मदतही होणार आहे.

मुसळधार पावसामुळे गोरेगाव पुर्वेकडील आरे कॉलनी युनिट क्रमांक ३ जवळील मुख्य रस्त्यावरील पुल अचानक खचल्याने खबरदाराची उपाय म्हणून या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. हा पुल खचल्याची माहिती मिळताच गृहनिर्मा, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सप्टेंबर महिन्यात स्वत: पहाणी करुन या पुलाच्या दुरुस्तीचा आढावा घेतला होता. हा पुल बंद करण्यात आल्याने आरेतील रहिवाशांना होणारा त्रास तसेच येथील पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळवून जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, तसेच आरेतील अन्य विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी गुरूवारी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, बेस्ट, सार्वजनिक बांधकाम, वाहतुक शाखेचे अधिकारी, पोलिस खात्याचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी काजरेकर, वनअधिकारी, म्हाडाचे अधिकारी आशिष चौधरी, उपविभागप्रमुख विश्‍वनाथ सावंत, उपविभाग संघटक शालिनी सावंत, उत्तर भारतीय मंचचे अध्यक्ष कैलासनाथ पाठक, माजी नगसेवक जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख संदिप गाढवे स्थानिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते.

आरेच्या मुख्य रस्त्यावरील पुल खचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतुक बंद करण्याचा निर्णय आरे प्रशासनाने घेतला.या मार्गावरील सर्व वाहतुक जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवर वळविण्यात आली आहे. आरेतील वाहतुक बंद करण्यात आल्याने येथील रहिवाशांना या मार्गावरुन ये जा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी तीन पर्याय सर्वानुमते मंजुर करण्यात आले आहे. यात आरेतील अंतर्गत रस्ते चांगले करण्यासाठी आरे आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव लवकर मंजुर करण्यात यावा, यासाठी त्यांनी आरेचे आयुक्त यांच्यासमवेत चर्चाही केली. याबाबत मुख्य रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत रॉयल पाममधील रहिवाशांसाठी फिल्टर पाडा येथील रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम आठवडयाभरात पुर्ण करावे, असे निर्देश वायकर यांनी अधिकार्‍यांना दिले. तसेच वनराई कॉलनी भिंती लगतच्या रस्त्याची रुंदी वाढवून या मार्गावरुन काही प्रमाणात वाहतुक वळविण्यात येणार असल्याने येथील रस्त्याचे कामही तातडीने पुर्ण करावे, असे निर्देश वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या कामांसाठी आवश्यकता भासल्यास आमदारकीचा निधीही देण्यात येईल, असेही राज्यमंत्री वायकर यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

आरेच्या आदिवासी पाड्यांवरील जनतेचे रक्षण करण्यासाठी पाड्यांच्या ठिकाणी सोलर लाईट लावण्यात यावेत, पाड्यात बायो टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश वायकर यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना दिले. तर जेथे बिबट्याचा वावर जास्त आहे, अशा पाड्यांमध्ये पिंजरा बसविण्यात यावा, अशा सुचनाही वायकर यांनी वनअधिकार्‍यांना दिल्या. आरेच्या मुख्य रस्त्यावरील बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरेने सुरु करावेत, अशा सुचनाही त्यांनी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget