प्रभाग क्र. ११६ च्‍या पोटनिवडणूकीसाठी ११ ऑक्‍टोंबर २०१७ला मतदान

मुंबई ( ९ ऑक्टोबर ) : भांडुप पश्चिम प्रभाग क्र. ११६ कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका श्रीम. प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर ११ ऑक्‍टोंबर २०१७ रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी २१ हजार ६६८ पुरुष व १६ हजार ४३७ स्त्रिया‍‍ असे एकूण ३८ हजार १०५ मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजाविणार आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्र. ११६ मधील सात ठिकाणी २९ मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संतोषकुमार धोंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची जय्यत तयारी करण्‍यात आली आहे. या निवडणूकीसाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित असून यामध्‍ये मुख्‍य लढत ही शिवसेना पक्षाच्‍या मिनाक्षी अशोक पाटील व भाजप पक्षाच्‍या जागृती प्रतीक पाटील यांच्‍यामध्ये होत आहे. मतमोजणी १२ ऑक्‍टोंबर २०१७ रोजी‘एस’ विभाग कार्यालयात करण्‍यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget