वाहन नोंदणी प्रमाणपत्र आता स्मार्ट कार्ड स्वरुपात मिळणार

मुंबई : मुंबई (मध्य) आरटीओ कार्यालयामार्फत वाहन नोंदणी प्रमाणपत्र हे स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येणार आहे. २०० रुपयांचे शुल्क भरुन नव्या स्वरुपातील हे वाहन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई (मध्य) च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आतापर्यंत कागदी स्वरुपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत होते. दिनांक २९ सप्टेंबर २०१७ पासून हे नोंदणी प्रमाणपत्र आता स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येत आहे. सध्या हे प्रमाणपत्र प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड स्वरुपातील हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता वाहन धारकास सीएमव्हीआर ८१ प्रमाणे २०० रुपये शुल्क प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे भरायचे आहे. ही रक्कम भरल्यानंतर वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड स्वरुपात तात्काळ जारी करण्यात येणार आहे. तरी इच्छूक वाहनधारकांनी २०० रुपयांचे शुल्क भरुन नव्या स्वरुपातील हे वाहन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई (मध्य) च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget