छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांसाठी विवरणपत्रे भरण्यास तीन महिन्यांच्या मुदतीची मागणी करणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : छोट्या व मध्यम व्यापा-यांकरिता जीएसटी अंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत वस्तू आणि सेवा कर परिषदेत मागणी करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जीएसटी अंतर्गत प्रत्येक व्यापा-याने प्रत्येक महिन्यात त्याच्या विक्री, खरेदीचा पूर्ण तपशील तसेच तपशीलावर आधारित विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. छोटया व मध्यम उलाढाल असलेल्या व्यापा-यांनी या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रत्येक महिन्यात सर्व तपशील भरणे ही अधिक कालापव्यय करणारी व खर्चिक बाब आहे, असे निवेदन देत आपली भूमिका विशद केली. व्यापारी बांधवांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिनिधींना जीएसटी अंतर्गत सर्व व्यापा-यांनी करासंदर्भात अनुपालन करणे आवश्यक आहे असे सांगितले. तसेच त्यांनी छोटया व मध्यम व्यापा-यांचा जीएसटी अंतर्गत अनुपालन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याऐवजी त्रैमासिक विवरण भरण्याचे प्रावधान जीएसटी कायद्याअंतर्गत करावे, अशी मागणी येत्या 6 ऑक्टोबर 2017 रोजी होणा-या वस्तू व सेवा कर परिषदेत करण्याची ग्वाही दिली. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget