महापौरांच्‍या हस्‍ते जुहू येथील सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्‍पचे उद्घाटन मुंबईकरांना दिलेल्‍या वचनांची पूर्तता – आदित्‍य ठाकरे

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : जुहू चौपाटीवर १०० शिडाच्‍या बोटींनी उजळणारी विद्युत रोषणाई प्रकल्‍पाचे उद्घाटन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्‍या हस्‍ते काल (दिनांक ३० ऑक्‍टोबर २०१७) रात्री करण्‍यात आले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी मुंबईकरांना जे-जे आश्‍वासित करण्‍यात आलेले आहे, त्‍याच्‍या पूर्ततेचे हे पाऊल असल्‍याचे प्रतिपादन ठाकरे यांनी केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित जुहू चौपाटी येथील सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्‍पाचे उद्घाटन काल रात्री (दिनांक ३० ऑक्‍टोबर २०१७) महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी विशेष उपस्थिती युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे, उप महापौर हेमांगी वरळीकर या होत्‍या, तर प्रमुख उपस्थितीत आमदार अमित साटम, आमदार अनिल परब, सभागृह नेते यशवंत जाधव, स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्‍यक्ष अनंत नर, शिक्षण समितीच्‍या अध्‍यक्षा शुभदा गुढेकर, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) चे अध्‍यक्ष तुळशीराम शिंदे, आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, विधी समितीचे अध्‍यक्ष ऍड. सुहास वाडकर, के/पश्चिम प्रभाग समितीचे अध्‍यक्ष योगीराज दाभाडकर तर अध्‍यक्षस्‍थानी स्‍थानिक नगरसेविका रेणू भसीन व सुधा सिंग, नगरसेवक अनिष मकवानी व रोहन राठोड तसेच उप आयुक्‍त (परिमंडळ - ४) किरण आचरेकर, उप आयुक्‍त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, नगरसेवक / नगरसेविका मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यावेळी म्‍हणाले की, काही महिन्‍यांपूर्वी जुहू चौपाटी येथे सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्‍पाचे भूमिपूजन करण्‍यात आले होते. महापालिका प्रशासनाने या प्रकल्‍पाचे काम
मुदतीत करुन नागरिकांच्‍या सेवेत समर्पित केले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाचे त्‍यांनी कौतुक केले. मुंबईकरांच्‍या विरंगुळा स्‍थळात याची एक मोठी भर पडली आहे. या प्रकल्‍पासारखे अन्‍य प्रकल्‍पही साकारण्‍यासाठी महापालिकेने प्रयत्‍न करावे. मुंबईत पावसात मोठ्या प्रमाणात नाले भरतात. हे नाले शक्‍यतो प्‍लॅस्‍टीकमुळे भरतात. यामुळे प्‍लॅस्‍टीक बंदीबाबत गंभीर विचार करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नागरिकांच्‍या वि‍विध हिताचे प्रकल्‍प महापालिका साकार करीत आहे. या प्रकल्‍पाला, योजनांना मुंबईकर नागरिकांनीही साथ द्यावी, असे आवाहनही आदित्‍य ठाकरे यांनी केले. तसेच महापालिकेच्‍या अर्थसंकल्‍पात बेस्‍टचाही अर्थसंकल्‍प विकल्‍प केला आहे. यामुळे बेस्‍टच्‍या कुटुंबियांना जे आश्‍वासन दिले होते, त्‍याचीही पूर्तता झालेली आहे.

मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यावेळी म्‍हणाले की, जुहू चौपाटीवर करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाईमुळे लहानांसह थोरांच्‍या विरंगुळात भर पडली आहे. महापालिका नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्‍ध करुन देताना त्‍या अद्वितीय राहतील याची काळजी घेते. नागरिकांनी आपले नागरी दायित्‍व लक्षात घेऊन पर्यावरणाचे रक्षण राहील, याची काळजी घेण्‍याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

आमदार अमित साटम यांनी आपल्‍या भाषणात सांगितले की, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने जुहू चौपाटीवर केलेली विद्युत रोषणाई प्रकल्‍प हा देशातील पहिला प्रकल्‍प आहे. या स्‍वरुपाचाच प्रकल्‍प समुद्रातील पाणी
शुद्दीकरणाच्‍या दृष्‍टीने करावा, असेही आवाहन साटम यांनी यावेळी केले. स्‍थानिक नगरसेविका रेणू भसीन यांचेही यावेळी समायोचित भाषण झाले.

जुहू चौपाटी येथील सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्‍पासाठी पुरेशी निधीची व्‍यवस्‍था केल्‍याबद्दल माजी स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष यशोधर फणसे व हा प्रकल्‍प वेळेत पूर्ण केल्‍याबद्दल उप आयुक्‍त (परिमंडळ - ४) किरण आचरेकर व उप आयुक्‍त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर यांचा महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर व युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget