अकार्यक्षम 'एएलएम' ची नोंदणी होणार रद्द, १६ ऑक्टोबर पासून प्रक्रियेस सुरुवात

'एएलएम'द्वारे केले जाते ७ हजारांपेक्षा अधिक इमारतींचे व्यवस्थापन

'एएलएम'द्वारे केवळ ३० ठिकाणी ओल्या कच-यापासून खत निर्मिती

मुंबई ( १२ ऑक्टोबर ) : ओल्या व सुक्या कच-याचे विभक्तीकरण सोसायटी स्तरावर व्हावे, तसेच ओल्या कच-यापासून खत निर्मिती होऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कच-याचे प्रमाण कमी होऊन कचरा व्यवस्थापन साध्य व्हावे, या प्रमुख उद्देशाने नोव्हेंबर १९९७ पासून 'प्रगत परिसर व्यवस्थापन' (ALM) या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत एक किंवा अधिक इमारतींचे प्रतिनिधी एकत्र येऊन अनेक ठिकाणी 'एएलएम' ची सुरवात झाली. 

सध्या महापालिका क्षेत्रात प्रगत परिसर व्यवस्थापनांतर्गत ७ हजारांपेक्षा अधिक इमारतींशी संलग्न आहेत. या 'एएलएम'द्वारे सध्या केवळ ३० ठिकाणी ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जात आहे. तर अनेक 'एएलएम' प्रत्यक्षात कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील सर्व 'एएलएम' च्या कार्यक्षमतेची तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी दिले आहेत.

'घनकचरा व्यवस्थापन नियम – २०१६' नुसार कच-याचे विभक्तीकरण व कच-यापासून खतनिर्मिती या बाबी 'एएलएम'च्या पुढाकाराने होणे अपेक्षित आहे. तसेच 'प्रगत परिसर व्यवस्थापन' (ALM) ही संकल्पना मुळात कचरा व्यवस्थापनाला गती देण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. मात्र अनेक 'एएलएम'द्वारे अपेक्षित काम केले जात नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात 'एएलएम' द्वारे ३० ठिकाणी कच-यापासून खत निर्मिती केली जात आहे. यामध्ये 'ए, एच पूर्व, टी' या विभागांमध्ये
प्रत्येकी १ ठिकाणी, 'जी दक्षिण व आर मध्य' या विभागात प्रत्येकी २ ठिकाणी, 'के पूर्व' विभागात ३ ठिकाणी, 'एम पूर्व' विभागात ५ ठिकाणी, 'एच पश्चिम' विभागात ६ ठिकाणी तर 'आर उत्तर' विभागात ९ ठिकाणी ओल्या
कच-यापासून खत निर्मिती करणा-या प्रकल्पांचा समावेश आहे.

त्यामुळे आता महापालिका क्षेत्रातील 'एएलएम'च्या कामांची गुणवत्ता व परिणाम वाढावा, यादृष्टीने सर्व एएलएमच्या कामांची तपासणी करण्याचे आदेश विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. या अंतर्गत संबंधित 'एएलएम'द्वारे गेल्या वर्ष भरात कचरा विभक्तीकरण, कच-यापासून खतनिर्मिती व त्याचे प्रमाण आदी बाबींची तपासणी केली जाणार आहे.

वरील तपशीलानुसार तपासणी केल्यानंतर ज्या 'एएलएम'द्वारे अपेक्षित काम केले गेले नसेल, अशा 'एएलएम' ची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात येऊन, नवीन 'एएलएम' ची नेमणूक करण्याची कार्यवाही देखील लगेचच सुरु केली जाणार आहे.

विभागास्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या परिसरातील 'एएलएम' अधिकाधिक कार्यक्षम होण्याच्यादृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करावयाचे आहेत. तथापि, ज्या 'एएलएम'द्वारे या बाबींना प्रतिसाद मिळणार नाही, अशा 'एएलएम'ची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे आदेश नव्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. तसेच याबाबत सर्व 'एएलएम' यांना त्यांचे अहवाल १६ ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याच्यादृष्टीने तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget