राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

मुंबई ( १५ ओक्टोबर ) : राष्ट्रीय सहकारी विकास निगम (रा.स.वि.नि.) च्या विविध योजनांसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीमध्ये विविध मंत्र्यांचाही समावेश आहे.

राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनांबाबत धोरण तयार करण्याचे कामही या उपसमितीवर सोपविण्यात आले आहे. या निगमच्या योजनांतर्गत कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना 1:9 या प्रमाणात शासन हमीवर कर्ज व भागभांडवल, शासकीय भागभांडवल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. निगमच्या योजनेअंतर्गत देय अर्थसहाय्य शासनास कर्ज म्हणून मिळते. यामुळे कृषी प्रक्रिया प्रकल्पाचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करण्याची जबाबदारी निगमची राहत नाही. यावरून प्रकल्प वर्धनक्षम असल्याची खात्री करण्याची व्यवस्था सध्या राज्य शासनाकडे नसल्याने प्रकल्पांवर निर्णय घेणे कठीण जाते. यामुळे विविध मुद्यांच्या अनुषंगाने शिफारस करण्याचे काम ही समिती करणार आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या उपसमितीमध्ये वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रा.स.वि.नि.चे सहायक संचालक ए.सी.खाडे यांचा समावेश आहे. तसेच उपसमितीचे सदस्य सचिव कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार हे आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget