येत्या 15 दिवसात फेरीवाल्यांना हटवा - राज ठाकरे


मुंबई : येत्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई. जर रेल्वेने केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसे त्यांना हटवतील, आणि जो संघर्ष होईल त्याची जबाबदारी रेल्वेची असेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट स्थानका पर्यंत काढण्यात आलेल्या संताप मोर्चा नंतर राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या भाषणात राज ठाकरे बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सुरेश प्रभू चांगले काम करत होते मात्र त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप ही यावेळी राज ठाकरेंनी केला.

गुजरात आणि मुंबईतील मूठभर गुजराती व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातो आहे, त्याची गरजच काय? कोणता मुंबईकर मुंबईहून बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

यावेळी राज ठाकरे यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायाधीशांना, तसेच देशभरातील माध्यमांना आणि संपादकांना आवाहन करुन, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी केली.

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख’ बाबत अमित शहा म्हटले होते की तो तर ‘चुनावी जुमला’ होता. नितीन गडकरी जाहीर मुलाखतीत म्हणतात ‘अच्छे दिन’चे हाडूक आमच्या गळ्यात अडकले आहे. यावरूनच सरकार किती दुटप्पी आहे हे स्पष्ट होते असाही आरोप त्यांनी केला. भाषणाच्या शेवटी एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget