‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना’ थकबाकीदार शेतक-यांना पाच समान हप्त्यात वीज बील भरण्याची सवलत

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : वीज बील थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेव्दारे पाच समान हप्त्यात वीज बील भरणा करता येईल. यासंबंधीचा सविस्तर शासननिर्णय आज जारी केला आहे.

कृषी पंपधारक ग्राहकांची आर्थिक स्थिती पाहता कृषी ग्राहकांच्या वीज बिलांचा भरणा करण्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 7.5% आहे. मार्च, 2017 अखेर एकूण 40.82 लाख ग्राहकांपैकी 37.64 लाख ग्राहकांकडे थकबाकी असून त्यांच्याकडील व्याज व दंडाची एकूण रक्कम सुमारे रुपये 8,382 कोटी एवढी आहे.

राज्यातील सर्व कृषी पंपधारक वीज ग्राहकांसाठी, वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी “मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना - 2017” जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व कृषी पंपधारक, उपसा जलसिंचन योजनेसहित, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र राहतील. एप्रिल, 2017 पुढील त्रैमासिक चालू वीज देयके दिनांक 7 नोंव्हेंबर, 2017 पूर्वी भरुन या
योजनेत सहभागी होता येईल.

31 मार्च 2017 अखेरीस असलेली वीज बिलाची मूळ थकबाकीची रक्कम हप्त्यात भरावयाची मुभा राहील. ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये 30,000 पेक्षा जास्त असल्यास ती 10 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील. मूळ थकबाकी रुपये 30,000 पेक्षा कमी असल्यास ती 5 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक तीन महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील. ज्या प्रमाणात पाच समान हप्ते कृषीग्राहक वेळेवर भरतील, त्या प्रमाणात कृषीपंप ग्राहकांचे व्याज व दंडनीय आकार माफ करण्याबाबत शासनातर्फे विचार करण्यात येईल.

पाच समान त्रैमासिक हप्ते हे अनुक्रमे डिसेंबर, 2017, मार्च, 2018, जून, 2018, सप्टेंबर, 2018 व डिसेंबर, 2018 अखेरीस भरणे आवश्यक राहील. या योजनेत भाग घेण्याकरिता मार्च, 2017 अखेरची मूळ थकबाकी दि. 31 डिसेंबर, 2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक राहील.  या योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनीने करावयाची आहे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget