गुरुवारी महापालिका मुख्यालयावर अधिकारी, कामगार आणि कर्मचाऱ्यांचा लक्षवेधी मोर्चा

मुंबई ( ३ ऑक्टोबर ) : मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 5 ऑक्टोबरला मुंबई महापालिकेतील हजारो कामगार, कर्मचारी आणि अधिकारी महापालिका मुख्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढणार आहे.

बायोमेट्रिक पद्धतीनेच उपस्थिती नोंदवण्याची केली जाणारी सक्ती रद्द करावी, 2016-17 चे बोनस/ सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे, वेतन व भत्ते सुधारणा, वैद्यकीय योजना पूर्वलक्षी प्रभावाने विनाविलंब सुरु करणे आदी मागण्यांसोबत कंत्राटीकरण, खासगीकरण आणि प्रशासनाच्या मनमानी व आडमुठ्या धोरणास विरोध करण्यासाठी मुख्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

मोर्चा मध्ये मुंबई महापालिकेतील सर्व 40 संघटना सहभागी होणार आहेत. 2000 साली कामगारांच्या प्रश्नावर महापालिकेतील सर्व संघटना एकत्र येऊन दोन वेळा संप केला होता. आता पुन्हा 17 वर्षानंतर कामगारांच्या 40 संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारा मोर्चात सुमारे 20 ते 25 हजार कामगार, कर्मचारी सहभागी होतील असा दावा समन्वय समितीने केला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget