गिरगाव परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बैठक संपन्न

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : गिरगाव परिसरातील पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली.

बैठकीत मार्गदर्शन करताना वायकर म्हणाले, येथील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत, क्लस्टर झोन असल्यास प्राधान्याने बाजूच्या इमारतींसह रहिवाशांनी क्लस्टर बनवावेत व प्रस्ताव सादर करावा. सद्यस्थितीत 4 इमारतींचे सर्व प्लॉट 4 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आहेत. ज्याचे क्षेत्रफळ 4 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आहे, त्यासाठी डी.सी.आर मध्ये आवश्यक तरतुदी कराव्यात.

या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजोसिंग पवार तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget