दक्षिण मुंबईत दर रविवारी सायकल ट्रॅक प्रस्तावित - सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर

एनसीपीए ते सी-लिंक दरम्यान २२ किमीचा ट्रॅक प्रस्तावित

परिरक्षणासाठी उद्योगसमूह / संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

मुंबई ( ५ ऑक्टोबर ) : दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनच्या जवळ असणा-या एनसीपीए पासून ते वरळी सी लिंक पर्यंत दर रविवारी व काही शनिवारी सकाळी ६ ते ११ या दरम्यान सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा सायकल ट्रॅक एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह) – बाबुलनाथ – गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) – ऍनी बेझंट मार्ग – खान अब्दुल गफ्फार खान मार्ग – राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) अशा सुमारे ११ किमी च्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच २२ किमी एवढ्या अंतराचा प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या या सुमारे २२ किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेर्फे तयार केल्या जाणार आहेत. तर दर रविवारी व काही शनिवारी सायकल ट्रॅकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वयन करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह / स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले आहेत. निवड होणा-या संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी व शर्तींवर जाहिरात करता येणार आहे, अशीही माहिती दिघावकर यांनी दिली आहे.

याबाबत इच्छुक उद्योग समूह / स्वयंसेवी संस्था इत्यादींनी दि. १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत रोजी महापालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. संपर्क साधण्यासाठी पत्ता पुढीलप्रमाणेः सहा. आयुक्त 'ए' विभाग यांचे कार्यालय, १३४ - ई, शहिद भगतसिंग मार्ग,
फोर्ट, मुंबई- ४०० ००१.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget