ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथाची यादी जाहीर

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : ग्रंथभेट येाजनेअंतर्गत सन 2015 मधील प्रकाशित ग्रंथाची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी राज्य शासनाच्या आणि ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.

राजा राममोहन राँय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ४२व्या ग्रंथभेट योजनेतर्गत सन २०१५ मध्ये प्रकाशित ग्रंथाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने निवड केलेल्या ८५५ ग्रंथांमध्ये ६१० मराठी, १३५ हिंदी व ११० इंग्रजी भाषेतील ग्रंथांचा या यादीत समावेश आहे. वाचकांच्या माहितीसाठी २७ सप्टेंबर २०१७ ते १६ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि ग्रंथाlलय संचालनालयाच्या www.dot.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी ठेवण्यात येणार आहे.

ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबद्दल काही सूचना, हरकती, आक्षेप तसेच ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यामध्ये काही बदल असल्यास १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंतचा ग्रंथालय संचालनालयास कळविण्यास यावे. आपल्या सूचना किंवा हरकती किंवा अपेक्षित बदल यासाठी संबंधितांनी लेखी स्वरुपात, टपालाने अथवा www.dot.maharashtra.gov.in या ई-मेलवर ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-२३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget