कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत बँकाकडे हयातीचा दाखला सादर करावा

मुंबई ( २६ ऑक्टोबर ) : अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई येथून निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृततीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दि. १ नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर २०१७ पर्यंत हयातीचा दाखला बँकेकडे सादर करावा. सादर करावयाच्या हयातीच्या दाखल्यांची अक्षरनिहाय यादी निवृत्तीवेतनधारकांच्या बँकाकडे पाठविण्यात आल्याचे अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी त्या बँकेत १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या
समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटावावा तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या या निवेदनात करण्यात आले आहे.
http://jeevanpramaan.gov.in या राष्ट्रीय सुचना केंद्र, पुणे यांच्या संकेतस्थळावरून जीवनप्रमाण दाखला (Digital Life Certificate) सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करतांना
निवृत्तीवेतनधारकांने त्यांचा निवृत्तीवेतन आदेश क्रमांक (PPO NO) बँकेत पाठवलेल्या यादीप्रमाणे अचूक नोंदवणे आवश्यक आहे. 

जे निवृत्तीवेतनधारक अधिदान आणि लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संणकीकृत हयातीचा दाखला सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जे निवृत्तीवेतनधारक बायोमेट्रिक्स सुविधा असलेल्या बँकेमार्फत किंवा नजीकच्या आधार केंद्राद्वारे अथवा खाजगी संगणकीकृत जीवनप्रमाण सुविधा केंद्राद्वारे हयातीचे दाखले सादर करू इच्छितात त्यांनी प्रथम या
कार्यालयाकडे त्यांचा PPO NO अचूक असल्याची खात्री करून घ्यावी व त्यानंतर खालील अचूक पर्याय निवडीची दक्षता घ्यावी. 

Pensioner Name:

PPO NO

Type of Pension

Sanctioning Authority

Disbursing Agency

Treasury/ Sub Treasury

Account Number (Pension)

E Mail: (optional)

ज्या निवृत्तीवेतनधाकांनी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखला सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर २०१७ पासून स्थगित करण्यात येईल, त्यामुळे १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचा हयातीचा दाखला विहित नमुन्यात वेळेत सादर करावा, असे ही अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई यांनी कळवले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget