आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राची युवा टीम हरयाणा येथे रवाना

मुंबई ( २५ ऑक्टोबर ) : युवावर्ग हा देशाच्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तरुणांचा देश अशी जगभरात भारताची ओळख आहे. हरयाणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करनाल येथे २९ राज्य, ७ केंद्रशासित प्रदेश व १२ देशातील साडे पाच हजार युवा प्रतिनिधी आणि कलाकार आंतरराष्ट्रीय युवा हार्मोनी महोत्सवासाठी एकत्र येणार आहेत. प्रितपाल सिंह पन्नु अध्यक्ष असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड फोरम फॉर आर्टिस्ट अँड अॅक्टिव्हिस्ट या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविधतेत एकता भारताची विशेषता दाखविण्यात येणार आहे. यासाठी हरयाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यपाल तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातूनही या महोत्सवासाठी डॉ. भरत जेठवानी यांच्या मार्गदर्शनाने "टीम महाराष्ट्रा" सांस्कृतिक राजधानी पुण्यावरून रवाना झाली. महाराष्ट्रातील युवा सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार्थी अशा २०० युवक, युवतींचा समावेश या टीम मध्ये आहे. यांचे नेतृत्व युवान फाऊंडेशनचे सदस्य सौरभ नावंदे करत आहेत. देश विदेशातून आलेले युवक आपआपल्या राज्यातील, देशातील परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन या महोत्सवात घडवणार आहेत. यात महाराष्ट्राची लोकधारा व संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्राचे कलाकार जगाला घडवणार आहे. तसेच या महोत्सवात डिजीटल इंडिया, भ्रष्टाचाराविरूद्ध लढा, युवकांचे राजकारणातील योगदान, स्कील इंडिया- स्मॉल स्केल टू एमएनसी, स्वच्छ भारत अभियान, लिंग समानता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, आतंकवादविरोधी लढा, अपंग व्यक्ती तसेच लहान मुलांची आव्हाने व समस्या यांवर चर्चा करताना टीम महाराष्ट्रातील युवा सामजिक कार्यकर्ते दिसणार आहेत.

या महोत्सवातील युवकांच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या युवा विचार या सत्रातून युवांना अनमोल मार्गदर्शन करण्यात येईल. यात आंतरराष्ट्रीय पर्यटन, कौशल्य विकास, कृषी तंत्रज्ञान, शिक्षण व केंद्र सरकारच्या विविध
योजनांची विस्तृत माहितीही उपस्थित युवकांना देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवकांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान निफाच्या या हार्मोनी
महोत्सवात होणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाचा समारोप नवी दिल्ली येथील इंदिरागांधी इंडोर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय युवा संवाद या कार्यक्रमाने होणार आहे. आजही शेकडो आईन्स्टाईन खेडेगावात गुरं हाकत आहेत. गरज आहे त्यांना सुयोग्य प्रवाहात आणण्याची. त्यासाठी या महोत्सवातील सहभागी तरुणांना योजना, उपक्रम तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचे मार्गदर्शन मिळणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget