उंदरांच्या चावा प्रकरणी संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटिस

उंदीर प्रतिबंधासाठी शताब्दी रुग्णालयात अतिरिक्त योजना प्रगतिपथावर

अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांचा पाहणी दौरा व तातडीची आढावा बैठकमुंबई ( १२ ऑक्टोबर ) : कांदिवली पश्चिमेतील महापालिकेच्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालय' (शताब्दी रुग्णालय) परिसरात उंदरांचा उपद्रव वाढल्याच्या घटना घडल्याने तसेच काही रुग्णांना उंदरांच्या चाव्याच्या प्रकरणी गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने उंदीर प्रतिबंधासाठी अतिरिक्त व तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दि. १० ऑक्टोबर २०१७ रोजी सदर रुग्णालयाची पाहणी केली.

तसेच संबंधित अधिका-यांची तातडीची बैठक देखील घेतली. या पाहणी दौ-यादरम्यान व बैठकी दरम्यान देण्यात आलेले निर्देश पुढीलप्रमाणे आहेः सदर रुग्णालयातील पाईपांवर 'रॅट गार्ड' बसविणे, जेणेकरुन पाईपांच्या आधारे उंदीर रुग्णालयात प्रवेश करु शकणार नाहीत.

उंदीर पकडण्यासाठी ग्लु-पॅड, रॅट गार्ड, रॅट ट्रॅप (पिंजरा) यासारख्या विविध साधनांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश. कच-यातील अन्नपदार्थ, फेकण्यात आलेल्या खाद्य योग्य बाबी इत्यादींमुळे उंदरांना त्यांचे अन्न सहजपणे उपलब्ध होते. ज्यामुळे उंदरांच्या संख्येत वाढ होण्यास बळ मिळते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयातील स्वच्छता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने देखील सर्वंकष प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने क्लिनअप मार्शलद्वारे रुग्णालयातील स्वच्छता विषयक बाबींवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान आढळून आलेली उंदरांची बिळे तातडीने शास्त्रीय पद्धतीने बंद करण्याच्या; तसेच उंदरांची संभाव्य प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना कीटक नियंत्रण विभागाला देण्यात आल्या.

छतामध्ये (False Ceiling) असणारी उंदरांची संभाव्य प्रवेशद्वारे अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे.

रुग्णालयातील खिडक्यांमधून उंदीर येण्याची संभाव्यता असते, ही बाब लक्षात घेऊन सर्व खिडक्यांना जाळ्या बसविण्याचे निर्देश देण्यात आले.

रुग्णालयाच्या साफसफाईसाठी ९ हाऊस किंपींग यंत्रणा व ४ बहुउद्देशीय कामगार संस्था यांना अस्वच्छतेच्या संबंधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तसेच सदर रुग्णालयात दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस (२४ x७) परिपूर्ण स्वच्छता व ठेवणे; तसेच त्याबाबत नियमितपणे पर्यवेक्षण करण्याचेही आदेश संबंधिताना देण्यात आले आहे.

रुग्णांकडून पैसे मागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने १ सुरक्षा रक्षक व १ कंत्राटी कामगार यांना सेवामुक्त (Termination) करण्यात आले.

स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच उंदरांचा उपद्रव नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचा अवलंब करणे; उदाहरणार्थ, डिस्प्ले बोर्ड, आरोग्य चर्चा (हेल्थ टॉक), उद्घोषण इत्यादी.

ज्या दोन रुग्णांबाबत उंदीर चाव्याच्या घटना घडल्या त्यापैकी एका रुग्णाच्या डाव्या डोळ्याजवळ उंदराने चावल्याचे आढळून आले. या रुग्णाची तातडीने नेत्र तज्ज्ञांद्वारे तपासणी करण्यात आली; तसेच 'व्ही स्कॅन' देखील करण्यात आले. सदर रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या डोळ्याला कोणतीही अंतर्गत हानी झालेली नाही. तर दुस-या रुग्णाच्या उजव्या तळपायाला उंदराने चावल्याचे लक्षात आले. या रुग्णावर देखील आवश्यक ते औषधोपचार तातडीने करण्यात आले. या रुग्णाची प्रकृती देखील स्थिर आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget