राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली

मुंबई ( २ ऑक्टोबर ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आर.ए.राजीव, अवर सचिव एम.के.वाव्हळ, कक्ष अधिकारी आर.एम.गोसावी, अजित पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

विधानभवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विधान परिषद सभापतींचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्ष यांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर यांच्यासह विधानभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्म प्रार्थना

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महात्मा गांधी स्मारक
समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी स्मारक समितीचे देवराज सिंग, संतोष भोईर, एस.पी.आहुजा, राम जाधव, प्रो. अमरसिंग आदी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget