‘शरद पौर्णिमा’ (कोजागरी) दिनी पवई उद्यान परिसरात थांबण्यास प्रतिबंध

मुंबई ( ३ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘शरद पौर्णिमा’ (कोजागरी पौर्णिमा) कालावधीत पवई उद्यान आणि तलाव परिसरात अभ्यागतांना तसेच नागरिकांना थांबण्यास तसेच उद्यानात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.

‘शरद पौर्णिमा’ निमित्त बुधवार, दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१७; गुरुवार, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०१७ आणि शुक्रवार, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१७ या तीन दिवशी पवई उद्यान आणि तलाव क्षेत्रात अभ्यागतांना तसेच नागरिकांना सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी ५.०० ते सकाळी ७.०० या कालावधीत मात्र कोणालाही या तीन दिवशी तलाव आणि उद्यान परिसरात थांबू दिले जाणार नाही, तसेच प्रवेशही दिला जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे. याबाबतीत नागरिक आणि अभ्यागत यांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget