क्रीडा पत्रकारांना विशेष पुरस्कार देणार - क्रीडामंत्री विनोद तावडे

स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा सुवर्ण

महोत्सवी पारितोषिक वितरण समारंभ २०१७ संपन्न

मुंबई ( २३ ऑक्टोबर ) : राज्य सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांना देण्यात येणा-या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये यंदापासून क्रीडा पत्रकारांचाही समावेश करण्यात येणार असून क्रीडा पत्रकारांना विशेष पुरस्कारने सन्मानीत करण्यात येईल, अशी घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी पारितोषिक वितरण समारंभ २०१७ चे वितरण आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना तावडे म्हणाले की, शिवछत्रपती पुरस्काराची निवड करताना कोणतेही राजकारण वा वशिलेबाजी चालणार नाही. यापुढे क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक पुरस्कारासाठी गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत रघुनंदन गोखले, ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे, जेष्ठ टेबलटेनिस पटू कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कार
विजेते मोनालिसा मेहता आणि माजी कसोटीपटू प्रविण आमरे आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

मलेशियावर मात करुन आशिया कप स्पर्धेत हॉकीचे विजेतेपद पटकावलेल्या भारतीय हॉकी संघातील गोलकिपर आकाश चिकटे याला यंदाचा स्पोर्टसमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बुध्दीबळपटू विदित संतोष गुजराथी यालाही स्पोर्टसमन ऑफ द इयर हा पुरस्कार देवून गौरविण्यात
आले. अन्य श्रेणींमध्ये खालील उत्कृष्ट क्रीडापटूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये कुमारी आदिती धुमटकर (जलतरण, मुंबई - स्पोर्टसवुमन ऑफ द इयर, अभिमन्यु पुराणिक
(बुध्दीबळ, पुणे– ज्यु.स्पोर्टसमन ऑफ द इयर), कुमारी रायना सलढाणा (जलतरण, मुंबई) आणि कुमारी दिया चितळे (टेबल टेनिस, मुंबई - ज्यु स्पोर्टसवुमन ऑफ द इयर), प्रशांत मोरे (कॅरम, मुंबई- स्पोर्टसमन ऑफ
द इयर – इंडियन गेम्स), केदार जाधव, (पुणे- क्रीकेटीयर ऑफ द इयर), अभिषेक नायर, मुंबई- रणजी ट्राफी क्रीकेटीयर ऑफ द इयर), स्मृति मंढाणा, (सांगली - वुमन क्रीकेटीयर ऑफ द इयर), पृथ्वी शॉ (मुंबई- ज्यु.क्रीकेटीयर ऑफ द इयर), मुंबई इंडियन्स (क्रिकेट – बेस्ट टीम ऑफ दे इयर), मुंबई सिटी एफसी
(फुटबॉल - स्पेशल टीम परफॉर्मन्स ऑफ द इयर), रिझवी कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स (बेस्ट कॉलेज ऑफ द इयर), डॉन बॉस्को हायस्कूल, माटुंगा (बेस्ट स्कूल ऑफ द इयर) 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget