उपहारगृहातील स्वयंपाकघराच्या आकारासाठी सुधारित नियम लागू

स्वयंपाकघरांसाठी असणारी किमान १५० चौरस फूटांची अट आता रद्द

'इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत महापालिकेचे सकारात्मक पाऊल

मुंबई ( २० ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात व्यवसाय सुरु करणे व व्यवसाय चालविणे या विषयीच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका आपल्या संबंधित कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा व प्रक्रियांचे सुलभीकरण करत आहे. याच शृखंले अंतर्गत आता उपहारगृहांमधील स्वयंपाक घरांसाठी असणारी किमान १५० चौरस फूटांची अट शिथिल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. तथापि, उपहारगृहांसाठी आवश्यक असणारे मुंबई अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असणार आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात उपहारगृह चालू करावयाचे झाल्यास त्यासाठी किमान ३०० चौ. फू. आकाराची जागा असणे बंधनकारक आहे. या जागेपैकी किमान १५० चौ. फू. एवढी जागा स्वयंपाकघरासाठी वापरली जाणे यापूर्वीच्या अटींनुसार बंधनकारक होते.

मात्र आता उपहारगृहांचे वैविध्य तसेच त्यानुसार असणारी स्वयंपाकघराची गरज लक्षात घेऊन उपहारगृहातील स्वयंपाक घरांसाठी असणारी १५० चौरस फूटांची अट रद्द करण्यात आली आहे. तथापि, उपहारगृहांच्या उंचीबाबत असणारी किमान ९ फूटांची अट पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. या सुधारणेमुळे उपहारगृहांमध्ये ग्राहकांना अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता दुणावणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget