मनसेचा ''विराट मोर्चा"


मुंबई ( ५ ऑक्टोबर ) : एलफिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीत 23 निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. शिवाय 50 हून अधिक जण जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज ''संताप मोर्चा'' काढण्यात आला. हा विराट मोर्चा मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट स्थानकापर्यंत होता.


सकाळी १० वाजल्यापासून विविध जिल्ह्यातून मनसे कार्यकर्त्यांची मेट्रो सिनेमाजवळ जमण्यास सुरुवात झाली होती. मनसे कार्यकर्ते भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त करू लागले. पालघर येथून आलेल्या आदिवासींनी आपल्या पारंपारिक नृत्य आणि गाण्यातून सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच राज ठाकरे यांच्या मोर्चाला मराठी सेलिब्रिटींने ही पाठिंबा दिला. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकारांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

दुपारी पावणे बाराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन राज ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना झाले. दुपारी दीड वाजता राज ठाकरे मेट्रो सिनेमाजवळ पोहोचल्यानंतर मनसेचा ''विराट मोर्चा'' चर्चगेटकडे रवाना झाला. मनसेच्या संताप मोर्चात मनसेचे कार्यकर्ते, आजी- माजी पदाधिकारी आणि नेते तसेच मुंबईकरही सहभागी झाले होते.

अर्धा तासानंतर म्हणजे २ वाजता राज ठाकरे यांचा ''संताप मोर्चा'' चर्चगेट स्थानकाजवळ पोहोचला. पण प्रचंड गर्दीमुळे राज ठाकरेंना रेल्वे मुख्यालयात जाण्यास अडथळा निर्माण झाला. पण पोलिसांनी गर्दी बाजूला करीत राज ठाकरे यांना वाट मोकळी करून दिली. राज ठाकरे रेल्वे मुख्यालयात आपल्या शिष्यमंडळा सोबत दाखल झाले. तिथे त्यांनी आपले निवेदन सादर केले. त्यानंतर पावणे तीन वाजता राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी २५ मिनिटे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget