मंत्रिमंडळ बैठक : २४ ऑक्टोबर २०१७ : नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन स्थापण्यास मान्यता

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाला गती


मुंबई ( २४ ऑक्टोबर ) : राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यासह निधी उभारणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड (Nagpur-Mumbai Super Communication Expressway Limited) या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच त्यासाठी कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणी करण्यासही मंजुरी देण्यात आली.

आजच्या निर्णयानुसार विशेष उद्देश वाहन कंपनीच्या (SPV) भागभांडवलापैकी किमान 51 टक्के भागभांडवल पूर्ण सवलत कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) राहणार आहे. तसेच
या दुय्यम कंपनीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, झोपडपट्टी विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी
अधिकारी (प्राधिकरण), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना संचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची निर्मिती, ग्रीनफिल्ड अलाईनमेंट आणि इतर सर्व कामांसाठी एमएसआरडीसीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गासाठी लॅण्ड पुलिंग योजनेंतर्गत जमीन संपादनासाठी विकसित जमिनीच्या स्वरुपात मोबदला किंवा प्रकल्पात भागीदारी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जमीन एकत्रीकरण योजनेत स्वेच्छेने सहभागी झाले नसलेल्या जमीन मालक किंवा
हितसंबंधित व्यक्तींची जमीन ही भूसंपादनासाठी लागू असलेल्या कायद्यानुसार संपादित करण्यात येणार आहे. अशा सर्व कामांसाठी ही एसपीव्ही सहाय्यभूत ठरणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी मार्ग हा एकूण 700 किमी लांबीचा असून राज्यातील 34 ग्रामीण जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांना फायदेशीर ठरणारा आहे. या मार्गामध्ये एकूण 392 गावे येत असून आजपर्यंत 371 गावांतील जमिनीची
संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे. तसेच 980 हेक्टर क्षेत्र खरेदीने ताब्यात घेण्यात आलेले आहे. या मार्गाची एकूण प्रकल्प किंमत 46 हजार कोटी एवढी आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget