संक्रमण शिबिरातील पात्र भाडेकरुंना तेथेच घरे देण्यात येतील - गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

मुंबई ( ४ ऑक्टोबर ) : मुंबई शहर व उपनगरात अस्तित्त्वात संक्रमण शिबिरातील पात्र भाडेकरु, रहिवासी यांना तेथेच घरे देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात अस्तित्त्वात असलेल्या संक्रमण शिबीरातील पात्र भाडेकरु, रहिवासी तसेच अपात्र वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत स्वतंत्र योजना राबविण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्यमंत्री रवींद्र वायकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, विकासकांना संक्रमण गाळे दिले असून भाडे वसुली तातडीने करण्यासाठी काम बंद करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत. सायन संक्रमण शिबीरात दैनंदिन भाडे वसुलीकार पाठवावेत, आवश्यक
कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अपात्र असलेल्यांना गाळे देण्याबाबत कायद्यात आवश्यक दुरुस्ती अथवा प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना आणावी, संक्रमण शिबीरात स्वच्छतेचे काम नियमित व सुरळीत होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराची देयके वेळेवर द्यावी. मास्टर लिस्टसाठी उपलब्ध घरांची यादी सादर करावी, अशा सूचनाही वायकर यांनी केल्या.

या बैठकीस नगरसेवक मंगेश सातमकर, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजोसिंग पवार तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget