लघु व मध्यम उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासन भांडवल उभे करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( ५ ऑक्टोबर ) : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे लघु व मध्यम उद्योगांतर्गत लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासन भांडवल उभे करणार तसेच या उद्योगांच्या भरभराटीसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सदस्य आणि राज्यातील समन्वयासाठी संयुक्त कार्यान्वयन समिती गठीत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथील एस.एम.ई. अंतर्गत 200 व्या कंपनीचे आज लिस्टींग करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, परकीय गुंतवणुकीसाठी राज्यास पसंती देण्यात येते, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे 50 टक्के गुंतवणूक ही राज्यात केली जात आहे. पायाभूत सुविधांसाठी राज्य अग्रेसर असल्याचे निती आयोगाच्या अहवालातही नमूद केले आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी राज्याने धोरण ठरविले असून त्याअंतर्गत विविध आरक्षण लागू केले आहे. याचा लाभ अधिक उद्योजकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.

लघु व मध्यम उद्योगाव्दारे सर्वाधिक रोजगार निर्मिती होत असते. भारतीय अर्थव्यवस्थेत या उद्योगांचे मोठे योगदान आहे. बी. एस. ई. द्वारे या उद्योजकांना प्रशिक्षण तसेच प्रोत्साहन दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून केवळ पाच वर्षांत 200 उद्योजकांचा समावेश करता आला आहे. मात्र ही संख्या लवकरच दोन हजार उद्योजकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बी. एस. ई. च्या इमारतीचा मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये समावेश करावा तसेच लघु व मध्यम उद्योजकांनी पर्यटन क्षेत्रात काम केल्यास पर्यटन विभागाकडून सहकार्य केले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, लघु व मध्यम उद्योगातून सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. देशभरात सुमारे दहा कोटी पर्यंत रोजगार निर्मितीची क्षमता या उद्योगांमध्ये आहे. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत शासन सकारात्मक असून या क्षेत्रातही लघु व मध्यम उद्योजकांना संधी उपलब्ध आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार दिलीप गांधी यांच्यासह बी.एस.ई.चे अध्यक्ष आशिष चव्हाण व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज विषयी
·        पाच हजार कंपनी लिस्टेड असलेले जगातील सर्वात मोठे एक्सचेंज
·        सहा मायक्रो सेकंदापेक्षा कमी वेळात प्रतिक्रीया देणारे सर्वात जलद तंत्रज्ञान
·        2.1 ट्रिलियन डॉलरची उलाढाल करणारे आणि 142 वर्षाचा इतिहास असणारे बीएसई

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget