छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा आज शुभारंभ

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण

मुंबई ( १८ ऑक्टोबर ) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ आज दि. 18 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 12 च्या सुमारास राज्यस्तरीय समारंभ होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी झाल्याबाबत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. अशाच स्वरुपाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात होणार असून पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget