कचरा व्यवस्थापनाचे काम न करणा-या २०९ प्रगत परिसर व्यवस्थापनांची नोंदणी रद्द

महापालिकेचा निर्णय


मुंबई ( २५ ऑक्टोबर ) : कचरा व्यवस्थापनाचे काम न करणा-या २०९ प्रगत परिसर व्यवस्थापनांची (एएलएम) नोंदणी रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात १९१ प्रगत परिसर व्यवस्थापन घनकचरा क्षेत्रात कार्यरत नसून १८ प्रगत परिसर व्यवस्थापन कार्यरत असले तरी त्यांचे काम समाधानकार नसल्याचे आढळले आहे. यामुळे या २०९ प्रगत परिसर व्यवस्थापनांची नोंदणी रद्द करुन त्यांच्या जागी नवीन प्रगत परिसर व्यवस्थापन नेमण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.

मुळात ओल्या व सुक्या कच-याचे वर्गीकरण सोसायटी स्तरावर व्हावे तसेच ओल्या कच-यापासून खत निर्मिती होऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कच-याचे प्रमाण कमी होऊन कचरा व्यवस्थापन साध्य व्हावे, या प्रमुख
उद्देशाने नोव्हेंबर १९९७ पासून प्रगत परिसर व्यवस्थापन या उपक्रमाची सुरुवात झाली होती. परंतु, प्रत्यक्षात अनेक 'एएलएम' कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्याची गंभीर दखील घेऊन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी सर्वच एएलएमच्या कार्यक्षमतेची व करीत असलेल्या कामांची तपासणी करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले होते, अशी माहिती श्री. बालमवार यांनी दिली.

महापालिकेच्या सर्व २४ विभागात पूर्वी ७१९ 'एएलएम' नोंदणीकृत होते. आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात ४५६ प्रगत परिसर व्यवस्थापन कार्यरत असल्याचे आढळून आले. यापैकी २६५ एएलएम घनकचरा क्षेत्रात कार्यरत आहेत. यात १४५ एएलएम चे काम समाधानकारक असून १२० एएलएमचे काम फारसे समाधानकारक नसल्याचे आढळले आहे. या १२० पैकी १८ एएलएमचे काम अजिबात समाधानकारक नसल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे स्पष्ट करुन बालमावार पुढे म्हणाले की, या असमाधानकारक काम असलेल्या उरलेल्या १०२ प्रगत परिसर व्यवस्थापनांचाही सविस्तर आढावा घेण्यात येत असून त्यातील ज्यांचे काम अपेक्षेनुसार नसेल त्यांचीही नोंदणी रद्द केली जाणार आहे.

'एएलएम' च्या कामाबद्दल पुढे माहिती देताना बालमवार म्हणाले की, समाधानकारक काम करणा-या १४५ 'एएलएम' पैकी सर्वात जास्त संख्या 'एच पश्चिम' या विभागात आहे. या विभागात ३८ एएलएम चांगले काम करीत असून 'के पश्चिम १९, एम पश्चिम १२, आर दक्षिण ११, एफ दक्षिण १०' अशी ही संख्या आहे. घनकचरा क्षेत्रात कार्यरत नसलेल्या एएलएमची संख्याही 'एच पश्चिम' मध्ये १२७ अशी सर्वात जास्त आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget