गोरेगाव पश्चिम परिसरातील रेड चिलीज आस्थापनेवर महापालिकेची कारवाई

२ हजार चौरस फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित

अतिक्रमण निर्मूलन ताफ्यातील पोलीसांच्या सहकार्याने 'पी दक्षिण' विभागाची धडक कारवाई

मुंबई ( ५ ऑक्टोबर ) : बृहन्मुंबई महापालिकेच्या परिमंडळ - ४ मधील 'पी दक्षिण' विभागात गोरेगाव पश्चिम परिसरामध्ये स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर असणा-या रेड चिलीज या आस्थापनेच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकाम केलेल्या परिसरात प्रामुख्याने अंतर्गत स्तरावरील अनधिकृत उपहारगृह चालविले जात होते, अशी माहिती पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे.

परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पी दक्षिण विभागात अतिक्रमणे / अनधिकृत बांधकामे इत्यादींच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार गोरेगाव पश्चिम परिसरतील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या रेड चिलीज या आस्थापनेच्या परिसरातील असणारी सुमारे २
हजार चौरस फूटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करण्यात आली होती. हे सर्व अनधिकृत बांधकाम आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तोडण्यात आले आहे.

ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार – कर्मचारी - अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आली. ही कारवाई पार पाडण्यासाठी इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी सतिश नरवणकर व दुय्यम अभियंता अनिकेत बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले, असेही जाधव यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget