कुर्ला रेल्‍वे स्‍टेशन येथील नव्‍याने बांधण्‍यात आलेल्‍या भुयारी मार्गाची महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली पाहणी

मुंबई ( १७ ऑक्टोबर ) : कुर्ला रेल्‍वे स्‍टेशनला पूर्व व पश्चिम दिशेने जोडणाऱया भुयारी मार्गाची मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज (दि. १७ ऑक्‍टोंबर २०१७) दुपारी पाहणी करुन महिलेच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने भुयारी मार्गात सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरे लावण्‍याची सूचना सबंधित अधिकाऱयांना करुन कामाचा आढावा घेतला. परिसरातील नागरिकांसाठी हा भुयारी मार्ग अत्‍यंत महत्‍वाचा असून हा भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरु करण्‍याबाबत महापौरांनी यावेळी रेल्‍वेच्‍या अधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी स्‍थानिक आमदार मंगेश कुडाळकर, ‘एल’ प्रभाग समिती अध्‍यक्ष दिलीप लांडे, नगरसेवक मोरजकर, माजी नगरसेविका डॉ.अनुराधा पेडणेकर हे मान्‍यवर उपस्‍थि‍त होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget