यात्रा ऑनलाईन करणार अजिंठा लेणीचे संवर्धन

नवी दिल्ली ( २६ ऑक्टोबर ) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे संवर्धन होणार आहे.‘यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमीटेड.’ या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रलयाच्यावतीने येथील राजपथ लॉन वर आयोजित ‘पर्यटन पर्व’ कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बुधवारी देशातील १४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ७ कंपन्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. राज्यातील औरंगाबाद जिल्हयातील प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या विकासासाठी ‘यात्रा ऑनलाईन प्रा.ली.’ कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही कंपनी ‘स्मारक मित्र’ म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अजिंठा लेणीच्या ठिकाणी पर्यटन पूरक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच या लेण्यांच्या सवंर्धनासाठी काम करणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या वर्षी २७ सप्टेंबर या ‘जागतिक पर्यटन दिना’ निमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या समन्वायातून देशातील स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांच्या सहभागातून संवंर्धन व विकासासाठी ‘वारसास्थळ दत्तक योजने’ ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील १४ स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, देशभरातून ५७ कंपन्यांचे अर्ज मंत्रालयाकडे प्राप्त झाले होते यापैकी ७ कंपन्यांची निवड करण्यात आली.

अंजिठा लेणी विषयी

इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातील अजिंठा लेणी कोरीव काम व रंगीत भित्तिचित्रासाठी जगप्रसिद्ध आहेत. याठिकाणी कोरीव काम असलेली बौद्ध मंदिरे, गुंफा, बुद्धांच्या जीवनातील कोरलेले अनेक प्रसंग आश्चर्यचकित करणारे आहेत.

देशातील या स्मारकांचे होणार संवर्धन

अंजिठयासह देशातील अन्य १३ स्मारकांचे ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत संवर्धन होणार आहे. यात दिल्लीतील जंतर-मंतर, कुतुबमिनार,सफदरजंग कबर, अग्रसेनची विहीर आणि पुराना किल्ला या स्मारकांचा समावेश आहे. तसेच, सूर्य मंदिर (कोणार्क), राजाराणी मंदिर (भुवनेश्वर), रतनगिरी स्मारक (ओडिसा), हंपी (कर्नाटक), लेह राजवाडा (जम्मू आणि काश्मीर),मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय(कोची), गंगोत्री मंदिर व गौमुख येथील त्रिभुज प्रदेश (उत्तराखंड), स्टॉक कांगरी लडाख(जम्मू आणि काश्मीर).
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget