प्रभाग क्र. ११६ च्‍या पोटनिवडणूकीत भाजपच्‍या जागृती पाटील विजयी

मुंबई ( १२ ऑक्टोबर ) :भांडुप पश्चिम प्रभाग क्र. ११६ कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर दि. ११ ऑक्‍टोंबर २०१७ रोजी झालेल्‍या पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्‍या जागृती प्रतीक पाटील यांनी ११ हजार १२९ मते पटकावून विजय संपादन केला. त्‍यांनी शिवसेनेच्‍या मीनाक्षी अशोक पाटील यांचा ४ हजार ७९२ मतांनी पराभव केला. शिवसेनेच्‍या मीनाक्षी अशोक पाटील यांना ६ हजार ३३७ मते मिळाली. सदर पोटनिवडणूकीची आज (दि. १२ ऑक्‍टोंबर २०१७) मतमोजणी करण्‍यात आली.

या निवडणूकीसाठी १० हजार ८६० पुरुष व ०८ हजार ४३६ स्त्रिया‍‍ असे एकूण १९ हजार २९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजाविला होता. निवडणूक निर्णय अधिकारी कल्‍याण पांढरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची मतमोजणी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget