मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारकार्डशी जोडावे

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई या कार्यालयामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांना व पालकांना कळविण्यात येते की, 2017-18 या वर्षापासून अनुसूचित जाती, विमुक्त व भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्गात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.

संकेत स्थळावरील योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आधार कार्ड स्वत:च्या नावे असलेल्या बँक खात्याशी लिंक करुन घ्यावे, तसेच योजनेचा अर्ज भरण्याबाबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget