लॅटीन अमेरिकन शिष्टमंडळाची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट

विविधतेतून दिसणारी राष्ट्रीय एकात्मता हीच भारताची खरी ताकत – ब्रिजेश सिंह

मुंबई ( ६ ऑक्टोबर ) : भारताची लोकसंख्या, विविध जाती, धर्म, भाषेचे लोक येथे राहत असूनही विविधतेतून दिसणारी राष्ट्रीय एकात्मता हीच भारताची खरी ताकत आहे. आज भारताने माहिती तंत्रज्ञान ते वाणिज्य, संसाधन निर्मिती अशा वेगवेगळया क्षेत्रात केलेली प्रगती पाहता येणाऱ्या काळात भारत हा सर्वच बाबतीत अग्रेसर असेल यात शंका नाही, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

लॅटिन अमेरिकन पत्रकार शिष्टमंडळाने मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला भेट दिली. यावेळी प्रसिद्धी अधिकारी राजिंदर कुमार, ल्युसिआना मार्टिन, माहिती संचालक अजय अंबेकर, माहिती संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते. यावेळी या शिष्टमंडळाने भारत दौऱ्यानिमित्त आलेले अनुभव, भारताचे वेगळेपण, आणि भारतातील लोकांनी त्यांचे केलेले स्वागत याबाबत आपले अनुभव सांगितले.

मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमाची दिली माहिती सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाची माहिती उपस्थित शिष्टमंडळाला दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधत असल्याने शासन आणि जनता यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे. राज्यातील जनतेने फोन, ईमेल आणि व्हॉटसअपदवारे विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरे देतात. त्याचप्रमाणे एखादी महत्वपूर्ण घोषणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असल्याची माहितीही सिंह यांनी यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिली.

कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य

आज महाराष्ट्रात देश विदेशातील पर्यटक येत असतात. मुंबई हे शहर आज सुरक्षित असून मुंबईत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तारण्यात येत आहे. याबरोरबच महाराष्ट्रात सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हाती घेण्यात आले असल्याची माहिती सिंह यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिली.

यावेळी या शिष्टमंडळाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये घेऊन आलेले राजिंदर कुमार म्हणाले की, या शिष्टमंडळाचा भारत दौरा यशस्वी झाला आहे. नवी दिल्लीचे निवडणूक आयोग, मुंबईचे स्टॉक्‍ एक्सचेंज, टीसीएस कंपनी अशा विविध ठिकाणी या शिष्टमंडळाने भेट दिली आहे. या दौऱ्यादरम्यान या शिष्टमंडळाला भारतातील लोकांशी थेट संपर्क करण्याची संधी मिळाली असल्याचेही सिंह यांनी यावेळी सांगितले.

या शिष्टमंडळात लुसियाना मार्टिनस्, फर्नान्डो कॅपटान्डो, ऑरीलेओ थॉमस, इझानी कायटॅनो, जोस कार्लोस आदींसह एकूण 30 सदस्यांचा समावेश होता. या सर्वांनी याभेटी दरम्यान आलेले अनुभव मांडले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget