महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात बुधवारी सार्वजनिक सुट्टी

मुंबई ( ९ ऑक्टोबर ) : नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक व इतर महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी त्या त्या कार्यक्षेत्रात, बुधवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. 116, पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. 21अ, नागपूर महानगरपालिका प्रभाग क्र. 35अ, कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. 11 या पोटनिवडणूक प्रभागांचा समावेश आहे. या महानगरपालिका व प्रभाग क्षेत्रातील मतदारसंघातील जे मतदार वरील कार्यक्षेत्राच्या बाहेर कामासाठी असतील त्यांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच या महानगरपालिका व प्रभाग क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget