महापौरांच्‍या हस्‍ते कुर्ला रेल्‍वे स्‍थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाऱया भुयारी मार्गाचे उद्घाटन

मुंबईचा सर्वांगिण विकास साधायचा आहे – आदित्‍य ठाकरे

मुंबई ( २६ ऑक्टोबर ) : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे कुर्ला रेल्‍वे स्‍थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाऱया भुयारी मार्गाचे उद्घाटन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्‍या हस्‍ते व युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २६ ऑक्‍टोबर, २०१७) संपन्‍न झाले.

युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, मुंबईचा सर्वांगिण विकास साधण्‍यासाठी मुंबईकरांची नेहमीच साथ लाभली आहे, मुंबईकरांनी ही साथ अशीच पुढे द्यावी, असेही ठाकरे म्‍हणाले.

महापालिकेच्‍यावतीने संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमास मुंबईच्‍या उप महापौर हेमांगी वरळीकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय पोतनीस, स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, एल प्रभाग समितीचे अध्‍यक्ष दिलीप लांडे, एल विभागाचे सहाय्यक आयुक्‍त अजितकुमार आंबी, प्रमुख अभियंता (पूल) शीतलाप्रसाद कोरी तसेच नगरसेवक, नगरसेविका, स्‍थानिक नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी स्‍थानिक नगरसेविका प्रविणा मोरजकर व दिलशानबानू आजमी या होत्‍या. 

मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यावेळी म्‍हणाले की, कुर्ला रेल्‍वे स्‍थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाऱया भुयारी मार्गाची मागणी बऱयाच वर्षांपासून कुर्ला वासियांनी केली होती. याकरीता या भागाचे माजी
खासदार व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी आपला निधी यासाठी उपलब्‍ध करुन दिला. बृहन्‍मुंबई महापालिका व रेल्‍वे प्रशासन यांनी योग्‍य समन्‍वय साधल्‍यामुळे हा भुयारी मार्ग साकारला आहे. महापालिका विविध उपक्रम, प्रकल्‍प सातत्‍याने मोठ्या प्रमाणात साकारत आहे. मुंबईकरांनी आमच्‍यावर जो विश्‍वास दाखविला आहे, तो आम्‍ही पूर्ण करुन दाखवू, असे आश्‍वासनही महापौरांनी यावेळी दिले.

युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महापालिकेच्‍या माध्‍यमातून मोठमोठे प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. आज कुर्ला रेल्‍वे स्‍थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाऱया भुयारी मार्ग
नागरिकांनी दिलेल्‍या आश्‍वासनाच्‍या पूर्ततेस साकारला आहे. गोरेगांव - मुलुंड लिंक रोडकरीता मंजुरीही नुकतीच प्राप्‍त झाली असून, हा प्रकल्‍पही नागरिकांच्‍या सेवेसाठी लवकरच सुरु करणार असल्‍याचे प्रतिपादनही त्‍यांनी केले.

यावेळी आमदार संजय पोतनीस व एल प्रभाग समितीचे अध्‍यक्ष दिलीप लांडे यांचीही यथोचित भाषणे झाली. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget