अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावेत

मुंबई ( १३ ऑक्टोबर ) : राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी आणि जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन उच्च ‍शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासनामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना असून सन 2017-18 साठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्तीचे नुतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2017 आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.dhepune.gov.in आणि
www.jdhemumbai.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच 022-22656600 या दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget