मंत्रिमंडळ बैठक : ( २४ ऑक्टोबर २०१७ ) : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई ( २४ ऑक्टोबर ) : मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येत असलेले मेट्रो रेल्वेचे जाळे आता अधिक विस्तारित होत असून ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-5 मार्गास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मार्ग एकूण 23.50 कि.मी.चा असून त्यामुळे मुंबई महानगराशी भिवंडी आणि कल्याणचा परिसर जोडण्यास मोठी मदत होणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या पूर्णत: उन्नत असलेल्या मार्गावर एकूण 16 स्थानके राहणार असून त्यात कल्याण एपीएमसी, कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव एमआयडीसी, राजनौली गाव, टेमघर, ओसवाल वाडी, गणेश नगर, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम आणि कापूरबावडी यांचा समावेश आहे. मार्च 2021 पर्यंत म्हणजे 41 महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 2021 मध्ये प्रति पाच मिनिटामागे एक गाडी याप्रमाणे वेळापत्रक असेल. या प्रकल्पाची
पूर्णत्वानंतरची एकूण किंमत 8 हजार 240 कोटी असेल. या मार्गामुळे 2021 मध्ये 2.3 लाख तर 2031 पर्यंत दैनंदिन तीन लाखाहून अधिक प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. वेळ, इंधन आणि खर्चातही बचत होणार असून रस्ते अपघात, ध्वनी व हवा प्रदूषण कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना मेट्रो मार्ग-४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) व मेट्रो मार्ग-११ (तळोजा - कल्याण) या मेट्रो मार्गाशी प्रवाशी जोडले जाणार आहेत. या मार्गावर किमान 10 व कमाल 50 इतके भाडे आकारण्यात येणार
आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget