'महापालिका शालेय विद्यार्थ्‍यांना मोफत बस पास’ वितरण सोहळा संपन्‍न

मुंबई ( ३१ ऑक्टोबर ) : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग हा विविध उपक्रमाच्‍या माध्‍यमातून महापालिका विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण देत असून देशातील कुठल्‍याही विद्यापीठाच्‍या स्‍पर्धेत टक्‍कर देण्‍यास महापालिकेचा शिक्षण विभाग सक्षम असल्‍याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व बेस्‍टच्‍या वतीने ‘ महापालिका शालेय विद्यार्थ्‍यांना मोफत बस पास’ चे वितरण समारंभ मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते तसेच युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या विशेष उपस्थितीत आज (दिनांक ३१ऑक्‍टोंबर २०१७) सायंकाळी महापौर निवास, शिवाजी पार्क, दादर येथे पार पडला, त्‍यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार अजय चौधरी, उप महापौर हेमांगी वरळीकर, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल.जऱहाड, ‘बेस्‍ट’ महाव्‍यवस्‍थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, सभागृह नेता यशवंत जाधव, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, शि‍क्षण समिती अध्‍यक्षा शुभदा गुढेकर, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष अनिल कोकीळ, स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्षा व स्‍थानिक नगरसेविका विशाखा राऊत, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्ष तुळशीराम शिंदे, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, विधी समिती अध्‍यक्ष अॅड. सुहास वाडकर, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, जी/उत्‍तर प्रभाग समिती अध्‍यक्ष मिलींद वैद्य, जी/दक्षिण प्रभाग समिती अध्‍यक्ष आशीष चेंबुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्‍दा जाधव, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्यवर उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे मार्गदर्शन करताना पुढे म्‍हणाले की, महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये र्व्‍हच्‍युअल क्‍लासरुम सुरु करण्‍याचा संकल्‍प असो की शालेय विद्यार्थ्‍यांना टॅब वितरण करण्‍याचा यामागे एकमेव
उद्देश हा महापालिका शाळेतील विद्यार्थी कुठल्‍याही स्‍पर्धेत मागे राहता कामा नये. त्‍याचबरोबर ‘ बेस्‍ट ‘ ची परिवहन सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी असून लांबच्‍या ठिकाणी राहणारा विद्यार्थी हा अंतरामुळे शालेय
शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शालेय विद्यार्थ्‍यांना मोफत बस पास देण्‍याचा उपक्रम आजपासून सुरु केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

त्‍याचप्रमाणे विद्यार्थ्‍यांनी शालेय जीवनात स्‍वप्‍न जरुर बघावे व त्‍या स्‍वप्‍नांच्‍या पाठीशी आम्‍ही निश्‍चितच राहू, असेही त्‍यांनी शेवटी सांगून सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.

मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, गणवेशधारी शालेय विद्यार्थ्‍यांना मोफत बस पास देण्‍याच्‍या संकल्‍पाची आज आपण पुर्तता करीत असून प्रथम टप्‍प्‍यात आठ हजार
विद्यार्थ्‍यांना व त्‍यानंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने तीन लाख एकतीस हजार सातशे पंचावन्‍न विद्यार्थ्‍यांना आपण मोफत बस पास देणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. गत काही दिवसापूर्वीच आपण ‘बेस्‍ट’ चा
अर्थसंकल्‍प महापालिकेच्‍या अर्थसंकल्‍पात विलीन करण्‍याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर केला असून आणखी एका संकल्‍पाची पुर्तता केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. उपस्थित विद्यार्थ्‍यांनी आदर्श नागरिक
म्‍हणून समाजाचे घटक व्‍हावे असेही त्‍यांनी सांगून शेवटी सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.

शि‍क्षण समिती अध्‍यक्षा शुभदा गुढेकर यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. तसेच अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल.जऱहाड यांच्‍या मदतीमुळे व बेस्‍ट समिती अध्‍यक्ष अनिल कोकीळ व त्‍यांचे अधिकारी यांच्‍या सहकार्यामुळे हा उपक्रम राबविणे लवकर शक्‍य झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी शिवडी कोळीवाडा मनपा शाळेतील पाच विद्यार्थ्‍यांना प्रातिनिधीक स्‍वरुपात मोफत बस पासचे वितरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget