बेस्ट कर्मचारी व अधिका-यांना सुधारणा करण्याच्या अटींवर आगाऊ रक्कम

मुंबई ( १८ ऑक्टोबर ) : बेस्टची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचारी संघटना दिवाळीसाठी बोनस मिळावा, यासाठी आग्रही आहे. आर्थिक स्थितीमुळे बेस्ट बोनस देण्याच्या स्थितीत नाही. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेलाही बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनस ऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरुपात (Advance) कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल.

सदर सुधारणांची प्रक्रिया सुरु झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरु न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget