पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी विचाराधीन कृषी विभागाकडून सूचना हरकतींचे आवाहन

मुंबई ( १८ ऑक्टोबर ) : कापूस आणि सोयाबीन यावर फवारणीसाठी वापरणाऱ्या पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 60 दिवसांसाठी बंदी आणण्याचे कृषी विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विभागाने सूचना व हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे.प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% इसी, फीप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% इसी, ॲसीफेट 75% एसी, डायफेन्थ्रेऑन 50% डब्ल्यूपी, मोनोक्रोटोफोस 36% एसएल (Profenophos 40% + Cypermethrin 4% EC , Fipronil 40% + Imidacloprid 40% EC, Acephate 75% SC,Difenthiron 50% WP, Monochrotophos 36% SL) या 5 कीटकनाशकांच्या वापरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

यासंदर्भात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे (CICR) संचालक, तसेच अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या कुलगुरुंकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. ही कीटकनाशके मनुष्यजिवितास हानीकारक असल्याने कीटकनाशक अधिनियम 1968 च्या कलम 27 मधील अधिकारांचा वापर करुन यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांमध्ये या 5 किटकनाशकांच्या विक्री, वितरण व वापरावर, विषबाधा प्रकरणाचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत, 60 दिवसांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लोकांनी सूचना/हरकती ई-मेलद्वारे acs.agri@maharashtra.gov.in वर कळवावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget